Close

आई सोनी राजदानच्या वाढदिवसाला आलियाने शेअर केला लहानपणीचा अनसीन फोटो, सोबतच शेअर केली भावनिक नोट (Alia Bhatt and Shaheen Bhatt Share Unseen Pics and Sweetest Notes To Wish Their Mom Soni Razdan’)

आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक अनसीन फोटो शेअर करून त्यांची आई सोनी राजदान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसानिमित्त भट्ट बहिणींनी त्यांच्या आईसाठी एक गोड संदेशही लिहिला आहे. आलिया आणि शाहीन व्यतिरिक्त, नीतू कपूरने आपल्या विहिणीसाठी एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जुन्या आठवणींना उजाळा देत आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट तिची आई सोनी राजदानच्या मांडीवर बसलेली आहे. दुसऱ्या फोटोत आलिया आणि तिची आई आनंदाने हसताना दिसत आहेत.

या फोटोंसोबतच आलियाने एका कॅप्शनमध्ये जुन्या फोटोमागील कथा सांगितली आहे, तिने लिहिले की - वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.. आम्ही तुझ्याशिवाय काहीच नाही.. आम्ही प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक मिनिटासाठी तुझे आभारी आहोत.. आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

शाहीन भट्टने तिची आई सोनी राजदान यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने बालपणीचे क्षण शेअर केले आहेत या फोटोंना कॅप्शन लिहिले की - माझ्या विश्वाचे केंद्र आहेस. आधी, आता, नेहमी... वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

सोनी राजदानच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टची सासू नीतू कपूर हिनेही शुभेच्छा दिल्या. सोनी राजदान आणि नीतू कपूर अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात.

Share this article