दलीप ताहिल हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय खलनायकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण अभिनेत्याशी संबंधित एक वाईट बातमी समोर येत आहे. कोर्टाने अभिनेत्याला 2 महिन्यांची शिक्षा सुनावली आहेदलीप ताहिलला ही शिक्षा 5 वर्षे जुन्या प्रकरणात देण्यात आली आहे.
65 वर्षीय अभिनेता दलीप ताहिलला हिट अँड रन प्रकरणी न्यायालयाने 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही बाब 5 वर्षे जुनी म्हणजेच 2018 सालची आहे. कयामत से कयामत, राजा, बाजीगर, कहो ना प्यार है, गुलाम यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार खलनायकी अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या दलीपवर दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा आणि रिक्षाला कारने धडक दिल्याचा आरोप करण्यात आला होता. .
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, घटनेच्या वेळी दलीप दारूच्या नशेत होते आणि त्यांच्याकडून दारूचा वास येत होता. दारूच्या नशेत त्यांना नीट चालताही येत नव्हते. आणि बोलत असतानाही त्याची जीभ अडखळच होती. साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दलीप ताहिलला दोषी ठरवले.
याशिवाय अभिनेत्याची कार ऑटोरिक्षाला धडकली, त्यामुळे एक महिलाही जखमी झाली. त्यामुळे सर्व साक्षीदार व वस्तुस्थितीच्या आधारे न्यायालयाने दलीपला 2 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.