आलिया भट्टसाठी आजचा दिवस खूप खास होता. आज तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी आलियाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता. आलिया भट्टच्या कारकिर्दीतील हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे, जो मिळाल्यानंतर आलिया खूपच उत्साहित दिसत होती.
आलिया पती रणबीर कपूरसोबत या पुरस्कार सोहळ्यात पोहोचली होती. दरम्यान, आलियाच्या लूकची खूप चर्चा होत आहे. यावेळी आलियाने खास आउटफिट निवडला होता. आलिया तिच्या लग्नाच्या साडीतच राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली होती. तिने तिच्या लग्नाच्या दिवशी जी मोती रंगाची साडी नेसली होती तिच परिधान केलेली.
आलियाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने मिनिमल मेकअप, हेअर बन, चोकर नेकलेस आणि स्टड इअररिंग्ससह लूक पूर्ण केला. याशिवाय, अभिनेत्रीने तिच्या लूकमध्ये लाल टिकली आणि केसांमध्ये पांढरे गुलाब देखील माळेलले. आलिया भारतीय पोशाखात खूपच सुंदर दिसत होती. आलियाला पुन्हा तिच्या लग्नाच्या पोशाखात पाहून तिचे चाहते तिची खूप प्रशंसा करत होते. मोठ्या प्रसंगी मोठ्या आठवणी कशा साजरी करायच्या हे फक्त आलियालाच समजते अशा शब्दात काहींनी तिचे कौतुक केले.
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलियाने संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले. संजय लीला भन्साळी यांना मी कधीही विसरू शकत नाही, असे तिने सांगितले. त्यांच्यामुळेच ती आज या पदावर आहे. "गंगूबाई काठियावाडी'साठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल माझ्या मनातील कृतज्ञता आणि संजय लीला भन्साळी यांचे विशेष आभार," आलिया म्हणाली.
दोन अभिनेत्रींना 69 व्या राष्ट्रीय पुरस्काराचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट्ट आणि 'मिमी'साठी क्रिती सेनॉन. तर अल्लू अर्जुनला 'पुष्पा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.