Close

पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान आलिया भट्टची लागली डुलकी, फोटो पाहून युजर्स घेतायत मजा (Alia Bhatt Spot Sleeping During PM Narendra Modi Speech )

शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह सेलिब्रिटी आणि काही हाय प्रोफाईल मंडळी मुंबईत 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सेशनच्या उद्घाटनाला उपस्थित होते. या सत्राची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यातील एका फोटोत आलिया भट्ट पती रणबीर कपूरसोबत तिच्या मागे बसलेली आहे आणि चक्क झोपलेली आहे. तर शाहरुख खान आणि दीपिका एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत

14 ऑक्टोबर,म्हणजेच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्याला राजकारणी, हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. चित्रपटसृष्टीतील शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अली भट्ट आणि रणबीर कपूर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सत्रादरम्यानचे बॉलिवूड सेलिब्रिटींचे इनसाइड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. छायाचित्रात बॉलिवूडचा किंग खान आणि दीपिका एकत्र बसले आहेत. आलिया भट्ट तिचा पती रणबीर कपूरसोबत त्यांच्या मागच्या रांगेत बसली आहे. पण आलिया भट्टने सोशल मीडिया यूजर्सचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. या फोटोत आलिया झोपलेली दिसत आहे.

फोटोमध्ये आलिया झोपलेली पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिला वाईट पद्धतीने ट्रोल करण्यास सुरुवात केली, यासोबतच ट्रोलर्सनी अभिनेत्रीचा पती रणबीर कपूरलाही लक्ष्य केले.

Share this article