Close

उपवासी इडली (Fasting Idli)

उपवासी इडली


साहित्य : 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी वरई तांदूळ, 3 चमचे लोणी, 1 चमचा जिरे, स्वादानुसार मीठ.
कृती : साबुदाणा व वरई तांदूळ तीन तासांकरिता वेगवेगळे पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीवर निथळून घ्या. दोन्ही एकत्रितपणे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
या पिठात जिरे, मीठ व थोडे पाणी घालून एकजीव करा. इडलीप्रमाणे पीठ तयार करा. इडली पात्राला तेल लावून त्यात हे पीठ घाला. कुकरमध्ये साधारण 10 मिनिटांसाठी वाफवा. गरमागरम इडली आमसुली वा चिंचुकीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Share this article