Close

खतरों के खिलाडी १३ ची ट्रॉफीचा विजेता ठरला डिनो जेम्स, विजेत्यावर पडलाय बक्षीस म्हणून पैशांचा पाऊस(Dino James win the trophy of Khatron Ke Khiladi 13)

'खतरों के खिलाडी १३' च्या या सीझनचा नवा विजेता घोषित झाला आहे. डिनो जेम्सने विजेता म्हणून बाजी मारली आहे. शोचा विजेता ठरल्यामुळे डिनोला २० लाखांचे बक्षीस आणि मारुती स्विफ्ट कार मिळाली. अरिजित तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा यांना टॉप ३ मध्ये होते. तर शिव ठाकरे टॉप ५ पर्यंतच पोहचला होता.

अंतिम फेरीत ऐश्वर्या शर्मा, डिनो जेम्स, अरिजित तनेजा, रश्मीत कौर आणि शिव ठाकरे यांच्यात ट्रॉफीसाठी जंग होती. सोशल मीडियावर चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना जोरदार समर्थन देत होते.

'खतरों के खिलाडी १३' चा विजेता

'खतरों के खिलाडी' मध्ये टेलिव्हिजन, बॉलिवूड आणि ओटीटीवरील वेगवेगळे सेलिब्रेटी स्पर्धक म्हणून सहभागी होतात. यंदाचा १३ वा सीझनही हिट ठरला. टीआरपीच्या बाबतीतही तो आघाडीवर होता.

अर्चना गौतम, शीझान खान, रोहित रॉय, शिव ठाकरे, अंजली आनंद, अंजुम फकीह, डेझी शाह, दिनो जेम्स, रुही चतुर्वेदी, ऐश्वर्या शर्मा, निरा एम बॅनर्जी, सौंदास मौफकीर आणि अरिजित तनेजा या सेलिब्रेटींनी यंदा या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.

Share this article