दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा'मध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारी रश्मिका मंदान्ना आता नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका लवकरच बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. रश्मिकाचा गोंडसपणा आणि सौंदर्य लोकांना वेड लावते, पण अभिनेत्रीमध्ये असे काही गुण आहेत, ज्या जाणून घेतल्यास तुम्हीही तिचे चाहते होऊ शकता. रश्मिका रोज सकाळी उठल्यानंतर तिच्या मोलकरणीच्या पाया पडते. याचे कारण जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच तिचे मोठे फॅन व्हाल.
रश्मिका तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते, पण तिच्या अभिनयासोबतच तिचा स्वभावही चाहत्यांना आवडतो. इतकंच नाही तर ती अनेकदा तिच्या संस्कार आणि कौटुंबिक मूल्यांबाबतही चर्चेत असते. दररोज सकाळी उठल्यानंतर रश्मिका आपल्या घरातील सदस्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेते, ती आपल्या मोलकरणीच्या चरणांना स्पर्श करण्यास विसरत नाही.
रश्मिकाचे तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे आणि तिने अनेक प्रसंगी तिच्या कुटुंबावर प्रेम व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे, एका मुलाखतीत तिच्या दैनंदिन दिनचर्याचा खुलासा करताना, अभिनेत्रीने सांगितले होते की ती दररोज तिच्या मोलकरणीच्या पायांना स्पर्श करते. अभिनेत्री म्हणाली होती की जेव्हाही ती कामावरून घरी परतते तेव्हा ती घरात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पायाला स्पर्श करते
अभिनेत्री म्हणाली होती की, मी घरी फक्त माझ्या आई-वडिलांच्याच पाया पडते असे नाही. माझ्या आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श करण्यासोबतच मी माझ्या घरातील मोलकरणींच्याही रोज पाया पडते. कारण मला कोणातही भेदभाव करायचा नाही आणि सर्वांचा समान आदर करायचा असतो. रश्मिकाच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या घरातील मोलकरणीचा जितका आदर करते तितकाच ती तिच्या आईवडिलांचा आदर करते.
रश्मिका शेवटची बॉलिवूड चित्रपट 'मिशन मजनू' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केलेले. आता लवकरच अभिनेत्री 'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर आणि रश्मिका व्यतिरिक्त अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये 1 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)