नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानने अखेर आपली मुलगी इरा खानच्या लग्नाची तारीख सांगितली आहे
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान नुपूर शिखरेसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होती, दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. इरा खान आणि नुपूर शिखरे यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली. या साखरपुड्याला आमिर खान, किरण राव, इम्रान खान, फातिमा सना शेख आणि मन्सूर अली खान यांच्यासह जवळचे मित्र आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याची मुलगी इरा खानच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. एका एंटरटेन्मेंट वेबसाइटनुसार आमिर खानने त्याची मुलगी इरा व तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ४ जानेवारीला लग्न करणार असल्याचे सांगितले. इरा आणि नुपूर यांचे या वर्षाच्या सुरुवातीला साखरपुडा झाला.
आमिरने लग्नाची तारीख जाहीर करण्यापूर्वी इरा या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. पण आता आमिर खाननेच ती 2024 च्या सुरुवातीला लग्न करत असल्याचे जाहिर केले आहे. मुलगी इराच्या लग्नाबाबत तो खूप भावूक असल्याचंही आमिरने म्हटलं आहे. लग्नाच्या दिवशी तो खूप रडणार आहे. आणि बाकीचे कुटुंबही यासाठी मानसिक तयारी करत आहे.
तारखेचा खुलासा करण्यासोबतच आमिरने आपल्या भावी जावयाचे खुलेपणाने कौतुक केले. अभिनेत्याने सांगितले की इराने निवडलेला मुलगा, हा फारच उत्तम आहे. त्याला आम्ही प्रेमाने पोपोय म्हणतो, तो एक ट्रेनर आहे, खूप गोड मुलगा आहे. जेव्हा इरा नैराश्याशी झुंज देत होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता. नूपुर हा एक अशी व्यक्ती आहे जो तिच्या पाठीशी उभा राहिला आणि इराला भावनिक आधार दिला. मला आनंद आहे की इराने असा मुलगा निवडला आहे... ते दोघे एकत्र खूप आनंदी आहेत. ते खूप चांगले आहेत, त्यांना खरोखर एकमेकांची काळजी आहे.
नुपूर हा मुलासारखा असल्याचेही आमिरने म्हटले आहे. आम्हांला खरंच वाटतं की तो कुटुंबाचा भाग आहे आणि त्याची आई, प्रीतमजी आधीच आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. लग्नात भावूक होणार का असे विचारले असता आमिर म्हणाला, “मी खूप भावूक आहे, त्या दिवशी मला खूप रडू येणार हे निश्चित आहे. त्या दिवशी आमिरला कसे सांभाळायचे, अशी चर्चा कुटुंबात सुरू झाली आहे. कारण मी खूप रडणार आहे. मला ना माझे हसू आवरता येते ना अश्रू.