दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ सिनेमांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता लवकरच ‘नाळ’ सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘नाळ २’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. खु्द्द नागराज मंजुळे यांनी सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. चाहत्यांना देखील सिनेमाचा टीझर प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘नाळ २’ सिनेमाच्या टीझरची चर्चा रंगली आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सोशल मीडियावर देखील सर्वत्र ‘नाळ २’ सिनेमाच्या टीझरची चर्चा रंगली आहे.
इन्स्टाग्रामवर ‘नाळ २’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये, ‘दिवाळीनिमित्त झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे यांच्याकडून प्रेक्षकांना खास भेट, सादर करत आहेत ‘नाळ – भाग दोन’ १० नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित…’ असं लिहिलं आहे.
टीझरच्या सुरुवातील चैत्या कुठेतरी चालत जाताना दिसत आहे. तेव्हा मध्येच चैत्याला त्याची क मैत्रीण भेटते आणि त्याला विचारते, ‘कुठे चालला..’ तेव्हा चैत्या म्हणतो, ‘मी माझ्या खऱ्या आईला भेटायला चाललो…’ पुढे मैत्रीण चैत्याला विचारते, ‘पुन्हा कधी येशील….’ यावर चैत्या म्हणतो ‘आता मी येतच नाही परत. मी चाललो…’ त्यानंतर चैत्या बसमधून निघून जातो.
असं टीझरमध्ये दिसत आहे, अशात चैत्या बसमधून कुठे गेला आणि सिनेमाची कथा पुढे काय असणार आहे… याबाबतची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते १० नोव्हेंबरच्या प्रतीक्षेत आहेत. कारण १० नोव्हेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.