Close

सिनेमा सुपरहिट होऊनही डिप्रेशनमध्ये गेलेली बेबो, म्हणाली मला ही आशाच नव्हती  (Kareena Kapoor went into Depression after this Film became Superhit)

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जाने जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. करिना ही इंडस्ट्रीतील टॉप आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु तिचा एक चित्रपट असा आहे, जो सुपरहिट ठरल्यानंतर करीना डिप्रेशनची शिकार झाली होती.

करीना कपूरने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात अभिषेक बच्चनसोबत 'रिफ्युजी' या सिनेमातून केली होती. तिचा पहिला चित्रपट पडद्यावर काही खास करू शकला नाही, पण त्यानंतर करिनाला एकामागून एक असे अनेक चित्रपट मिळाले, ज्यांनी तिची कारकीर्द उंचावली.

बेबोने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, मात्र जेव्हा तिने शाहिद कपूरसोबत 'जब वी मेट' चित्रपटात काम केले तेव्हा तिने सर्वांची मने जिंकली. करिनाने या चित्रपटात गीत ही व्यक्तिरेखा साकारली होती, जी आजही करीनाची प्रेक्षकांची आवडती भूमिका आहे.

या चित्रपटात शाहिद आणि करिनाची जबरदस्त रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली, ज्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील यशाचे सर्व रेकॉर्ड तोडले. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर करीना कपूर आनंदी होण्याऐवजी डिप्रेशनमध्ये गेली होती.

करीना कपूर जेव्हा 'जब वी मेट' या चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा तिच्याकडे सैफ अली खान आणि अक्षय कुमार स्टारर 'टशन' चित्रपट देखील होता. या दोन्ही चित्रपटांची शूटिंग ती एकत्र करत होती. करिनाने 'टशन' या चित्रपटासाठी झिरो फिगरही केली होती. 'टशन' हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील संस्मरणीय चित्रपट ठरेल आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल, असे तिला वाटत होते.

मात्र, जेव्हा 'जब वी मेट' हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांना गीतचे पात्र खूप आवडले आणि चित्रपट सुपरहिट ठरला. जेव्हा करीनाचा 'टशन' रिलीज झाला तेव्हा त्याने करिनाच्या आशा धुळीस मिळवल्या कारण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच फ्लॉप झाला. 'जब वी मेट'चे यश साजरे करण्याऐवजी 'टशन'च्या अपयशाने अभिनेत्री इतकी दुखावली की ती डिप्रेशनमध्ये गेली.

याचा खुलासा खुद्द करीना कपूरने एका मुलाखतीत केला आहे. ती म्हणाली होती की ती 'जब वी मेट'च्या सेटवर फक्त तिचा मुख्य प्रोजेक्ट 'टशन' आहे असा विचार करून जायची आणि माझ्या सगळ्या अपेक्षा 'टशन'कडून होत्या, पण जेव्हा तो फ्लॉप झाला आणि 'जब वी मेट' सुपरहिट झाला. त्यामुळे मी वाईटरित्या कोलमडून गेले आणि सुमारे ६ महिने डिप्रेशनमध्ये गेले.

करीना म्हणाली की, 'जब वी मेट' चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर आणि 'टशन' फ्लॉप झाल्यानंतर हे कसे घडले हे मला समजले नाही. मला 'टशन'चे अपयश स्वीकारता आले नाही आणि हे समजायला मला 6 महिने लागले, कारण 'टशन' फ्लॉप होईल आणि 'जब वी मेट' ब्लॉकबस्टर ठरेल असे मला कधीच वाटले नव्हते. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)

Share this article