दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने अप्रत्यक्षपणे अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला आहे. श्वेता सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने अप्रत्यक्षपणे रियाचा खरपूस समाचार घेतला आहे.
श्वेता सिंग नेहमीच तिचा दिवंगत भाऊ आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे जुने फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच श्वेताने सुशांत सिंगचे आणखी काही जुने फोटो शेअर केले आहेत.
या जुन्या फोटोंमधील पहिल्या फोटोत सुशांत सिंह राजपूत लहान मुलांसोबत खेळताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत अभिनेता त्याच्या चाहत्यांसोबत पोज देताना दिसत आहे. आणि शेवटचा फोटो सुशांतचा सोलो फोटो आहे. हे फोटो शेअर करताना श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, तुम्ही गेलेल्या व्यक्तीला दोष देऊन स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय उत्तर द्याल हे मला खूप आश्चर्य वाटते!”
श्वेताने असेही लिहिले - माझा भाऊ अत्यंत शुद्ध मनाचा माणूस होता आणि आजही तो लाखो लोकांच्या हृदयात आहे. आम्हाला जगाला काहीही सांगण्याची गरज नाही, कारण लोकांना सत्य वाटू शकते. तो भाऊ होता, भाऊ आहे आणि नेहमीच आमचा अभिमान असेल. प्रत्येक हृदयात त्याने जागृत केलेले प्रेम.. ते कधीच मरणार नाही!! त्याच्या न्यायासाठी आम्ही सतत लढा देऊ.'' यासोबतच श्वेताने #'Justice for Sushant' आणि #Sushant Singh Rajput असे लिहिले आहे.
रिया चक्रवर्तीने अलीकडेच इंडिया टुडेला दिलेल्या तिच्या ताज्या मुलाखतीत सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने बोलले होते.