मार्गरिटा पिझा
साहित्य : मार्गरिटा सॉससाठी : 5 टोमॅटो, 1 कांद्याची पात चिरलेली, 1 टीस्पून लसणीचा पेस्ट, 1 टीस्पून ऑरिगॅनो, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून मोहरी पूड, थोडी तुळशीची पानं चिरलेली, 2 टीस्पून कॅप्सिको सॉस, 3 टेबलस्पून टोमॅटो सॉस, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड.
इतर : 1 पिझा बेस.
टॉपिंगसाठी : काळे ऑलिव्ह आणि सिमला मिरची बारीक चिरलेली, उकडलेले मक्याचे दाणे, किसलेलं चीझ.
कृती : टोमॅटो ब्लांच करून चिरा. सॉससाठीचं सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर एका पॅनमध्ये घालून दाट होईपर्यंत शिजवा. मार्गरिटा सॉस तयार होईल.
आता हा मार्गरिटा सॉस पिझा बेसवर पसरवून त्यावर चीझ भुरभुरा. प्रीडिटेड ओव्हनमध्ये 200 डिग्री सेल्सियसवर चीझ विरघळेपर्यंत पिझा बेक करा. नंतर त्यावर टॉपिंगचं साहित्य सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.