सर्वात लोकप्रिय प्रभावशाली सोशल मीडियास्टार उर्फी जावेदची धाकटी बहीण उरुसा जावेदने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंवरून नेटिझन्स असा अंदाज लावत आहेत की उर्फी जावेदने गुपचूप साखरपुडा केला आहे?
माजी बिग बॉस ओटीटी स्पर्धक उर्फी जावेद नेहमीच तिच्या अनोख्या, बोल्ड आणि विचित्र फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. चर्चेत राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. आज पुन्हा एकदा उर्फी सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यामुळे उर्फी तिच्या चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या उर्फीच्या फोटोंमध्ये ती पूजा करताना दिसत आहे. हे फोटो पाहून उर्फीचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि विचारत आहेत की उर्फीने गुपचूप साखरुपडा केला आहे का?
पूजा करतानाचे उर्फीचे हे फोटो तिची धाकटी बहीण उरुसा जावेदने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हायरल झालेल्या रोका सोहळ्याच्या या फोटोंमध्ये उर्फी तिच्या मिस्ट्री मॅनसोबत पूजा करताना दिसत आहे. त्यांच्यासमोर हवनकुंडही ठेवण्यात आला आहे. फोटोंमध्ये त्यांच्यासोबत पंडितजीही दिसत आहेत.
तिच्या रोका समारंभाच्या फोटोंमध्ये उर्फीने निळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. पण उर्फीने या फोटोमागील सत्य अद्याप सांगितलेले नाही. म्हणजेच अभिनेत्रीने अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी उर्फी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी लालबागला गेली होती.