राजीव खंडेलवालसाठी महिला चाहत्यांमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. छोट्या पडद्यावर 'सुजल'ची भूमिका करून मुलींच्या हृदयाची धडकन झालेल्या आणि घराघरात लोकप्रियता मिळवणाऱ्या राजीव खंडेलवाल यांना त्यांच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. त्यांच्या संघर्षाच्या दिवसात त्यांना कधी उपाशी झोपावे लागले तर कधी उदरनिर्वाहासाठी त्यांना पेंटिंग विकावी लागली,. पुढे त्यांचे नशीब पालाटले आणि ते घराघरात लोकप्रिय झाले.
राजीव खंडेलवाल यांनी टीव्हीवर प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी खूप संघर्ष केला. एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, करिअरच्या सुरुवातीला त्याने असे दिवसही पाहिले की तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. ते रिकाम्या पोटी झोपले होते. कधी-कधी त्यांना पेंटिंग विकून आपला उदरनिर्वाह करावा लागत होता, पण 1998 मध्ये त्याला टीव्ही शो 'बनफूल'मध्ये ब्रेक मिळाला, त्यानंतर त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. टीव्हीवर नाव कमावल्यानंतर हा अभिनेता मोठ्या पडद्याकडे वळला, पण तिथे तो लोकांची मने जिंकू शकला नाही आणि आता चित्रपटांव्यतिरिक्त तो ओटीटीवर काम करत आहे.
छोट्या पडद्यावर खळबळ माजवल्यानंतर राजीव खंडेलवाल मोठ्या पडद्यावर आपले नशीब आजमावायला आले तेव्हा सुरुवातीला वाटत होते की ते बॉलिवूड इंडस्ट्रीतही प्रसिद्ध होतील, पण तसे होऊ शकले नाही. टीव्ही इतके त्याला सिनेमात यश मिळाले नाही.
राजीव खंडेलवाल लोकप्रिय टीव्ही शो 'कहीं तो होगा' मध्ये सुजलची भूमिका साकारून घराघरात नाव कोरले होते. या शोच्या माध्यमातून त्याला रातोरात असे यश मिळाले, जे कोणत्याही अभिनेत्याला मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतील. छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळविणाऱ्या राजीवला मोठ्या पडद्यावर काही खास कामगिरी दाखवता आली नाही.
राजीवने 2008 मध्ये 'आमिर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला असे वाटत होते की तो मोठ्या पडद्यावरही खळबळ उडवून देईल आणि त्याला अनेक चित्रपट मिळाले, पण तो मोठ्या पडद्यावर आपल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही. मोठ्या पडद्यावर लीड हिरो बनण्याऐवजी तो साइड हिरोच राहिला. तो लीड हिरोपासून साइड हिरोमध्ये कधी बदलला हे त्याला स्वतःलाही कळू शकले नाही. अलीकडेच तो शाहिद कपूरच्या 'ब्लडी डॅडी' या चित्रपटात दिसला होता.
'कहीं तो होगा' नंतर त्याला अनेक हिट शो मिळाले आणि त्यानंतर या अभिनेत्याने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. अभिनेता 'आमिर', 'शैतान', 'साउंड ट्रॅक' आणि 'टेबल नंबर 21' सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय त्याने 'सच का सामना' आणि 'जज्बात' सारखे शो देखील होस्ट केले. 'हक से', 'मर्जी' आणि 'नक्षलबारी' यांसारख्या अनेक वेब सीरिजमध्ये तो दिसला आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)