पंकज त्रिपाठी सध्या 'फुक्रे 3' मुळे चर्चेत आहे. चित्रपटात पंडितजींची भूमिका साकारून तो लोकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. याआधी 'ओह माय गॉड 2' (OMG 2) या सिनेमातून त्याने लोकांची मने जिंकली होती. दोन चित्रपटांच्या यशानंतर पंकज त्रिपाठी सतत प्रसिद्धीच्या झोतात आहेत. पंकज त्रिपाठीने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, आता तो कमी चित्रपट करणार आहे कारण आता तो खूप काम करून थकला आहे.
'फुक्रे ३'च्या यशानंतर पंकज त्रिपाठी सातत्याने मुलाखती देत आहेत. आता त्याने एका मुलाखतीत आपल्या कामाबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला की आता त्याला त्याच्या कामाचा वेग कमी करायचा आहे. अभिनेता म्हणाला, "मी आता कमी चित्रपट करत आहे, कारण आता मी थकलो आहे. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे मी हा शॉट केव्हा दिला, काय झाले आणि कोणत्या चित्रपटासाठी हे मला आठवत नाही. ही परिस्थिती चांगली नाही. तुम्ही 340 दिवस अभिनय करु शकता, पण ते कायमचे करू शकत नाहीस. मी तेच करत होतो. आता मला ते करायचे नाही.
पंकज त्रिपाठी यांनी अधिक काम करण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला, "जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही जास्त खाता आणि जेव्हा तुमच्या ताटात चांगले जेवण दिले जाते, तेव्हा तुम्ही नक्कीच जास्त खातात. एक अभिनेता म्हणून माझ्यासोबतही असेच काहीसे घडत आहे.
मला ज्या काही कथा आवडल्या, मी त्यांचा एक भाग झालो. मला खूप काम येत होते आणि मी खूप खात होतो. पण आता मला माझा वेग कमी करायचा आहे, म्हणून मी कमी चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे.”
पंकज त्रिपाठीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर, ते सध्या 'मैं अटल हूं'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत, ज्यामध्ये ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे.