जीवनाला कलाटणी देणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटाचा २ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर प्रदर्शित होणार आहे. सुरेश शंकर झाडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात सयाजी शिंदे, शक्ती कपूर, राखी सावंत, रोहित हंचाटे आणि अतुल परचुरे हे नामवंत कलाकार दिसणार आहेत.
चित्रपटाची कथा श्रवण आणि त्याच्या प्रतिभावंत आयुष्याभोवती फिरते. श्रवणच्या आयुष्यात घडलेली एक भावनाविवश करणारी घटना त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन जाते. श्रवणचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी एक प्रेरणा असून विचार करायला लावणारा आहे.
“आजच्या तरुणांना आपल्या पालकांचे महत्त्व सांगण्यासाठी आणि आपल्या पालकांप्रती आदर कमी होऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ‘आधारवड’ हा चित्रपट आजच्या तरुण वर्गाने आवर्जून पाहायला हवा.” असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंटचे सी.इ.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.