Close

मुकेश छाबराने शेअर केला दिवंगत आई आणि सुशांत सिंह राजपूतचा फोटो (Mukesh Chhabra Shares Unseen Pic Of Sushant Singh Rajput Having Aloo Parathas With His Late Mom)

बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी नुकताच सोशल मीडियावर एक अनसीन फोटो शेअर केला आहे. हा त्यांचा खास मित्र, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह आणि त्यांच्या दिवंगत आईचा हा थ्रोबॅक फोटो आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सुशांत सिंह मुकेश छाबरा यांच्या आईसोबत आलू पराठ्याचा आस्वाद घेताना दिसत आहे.

मुकेश छाबरा यांनी एक अनसीन फोटो इंटरनेटवर शेअर केला, जो पाहून चाहते खूप भावूक झाले. मुकेश छाबरा यांची दिवंगत आई आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा हा अनसीन फोटो आहेत. ज्यामध्ये सुशांत मुकेश छाबरा यांच्या आईसोबत आलूपराठ्यांचा आस्वाद घेताना दिसत आहे.

हा न पाहिलेला फोटो शेअर करताना मुकेश छाबरा यांनी कॅप्शन लिहिले - आई आणि सुशांत सिंग राजपूत आलू पराठे खातानाचा हा फोटो मिळाला. मला खात्री आहे की ते दोघेही आता आरामात बसून आलू परांठ्यांचा आस्वाद घेत असतील. #missingbothofthem #lifeistrange #love #love.

सोशल मीडियावर हा फोटो पाहून अभिनेत्याचे चाहते आणि फॉलोअर्स भावूक होत आहेत. कोणीतरी लिहिले आहे की मला खात्री आहे की मित्रा ते एकत्र असतील. तर सुशांतच्या न्याय मिळाण्याबद्दल आणखी एका चाहत्याने लिहिले आहे, सुशांत सरांना न्याय का मिळाला नाही, जिवंत व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते?

कमेंट करताना अभिनेत्याच्या आणखी एका चाहत्याने लिहिले की, त्याला त्यांची खूप आठवण येते. एक तरुण प्रतिभावान माणूस असण्यासोबतच तो एक चांगला अभिनेता देखील होता.

Share this article