Close

पहिल्याच भेटीत करण जोहरने शाहरुखला सांगितलेले शर्टाची बटणे उघड (When Karan Johar told Shahrukh Khan, ‘Open the Button of Your Shirt’)

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे  शाहरुख खान सध्या सिने इंडस्ट्रीवर राज्य करत आहे, तर करण जोहरचेही नाव सध्याच्या इंडस्ट्रीतील टॉप निर्मात्यांमध्ये घेतले जाते. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले करण जोहर आणि शाहरुख खान हे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शाहरुख खान आणि करण जोहर यांच्यात आज जरी चांगली मैत्री असली,  त्यांच्या पहिल्या भेटीचा अनुभव दोघांसाठी चांगला नव्हता. अलीकडेच करण जोहरने शाहरुख खानसोबतच्या त्याच्या पहिल्या भेटीची एक रंजक गोष्ट शेअर केली.

चित्रपट निर्माते करण जोहरने सांगितले की, पहिल्या भेटीत त्याने शाहरुख खानला शर्टाची बटणे उघडण्यास सांगितले होती आणि किंग खानला ते ऐकून आश्चर्य वाटले. करणचे हे बोलणे ऐकून किंग खानला धक्काच बसला आणि त्याने करणची तक्रार आदित्य चोप्राकडे केली.

ही मजेदार घटना 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडली, ज्याचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा करत होते आणि करण जोहर त्यांना असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खान आणि करण जोहर पहिल्यांदा भेटले होते असे म्हटले जाते, जिथे पहिल्यांदा भेटल्यावर करण जोहरने शाहरुख खानला त्याच्या शर्टचे बटण उघडण्यास सांगितले.

मुलाखतीत करण जोहरने सांगितले की, त्याला शाहरुख खानसोबतची पहिली भेट आठवते, ज्याचा अनुभव खूपच विचित्र होता. तो म्हणाला की मला आठवतंय की मी 'डीडीएलजे'मध्ये असिस्टंट होतो. मी शाहरुख खानला म्हणालो की अरे, तुला माहित आहे तू रँग्लर जीन्स घातली आहेस, तू लेव्हीची जीन्स घालायला हवी होतीस. करणने सांगितले की, हे ऐकून शाहरुख पूर्णपणे आश्चर्यचकित झाला, पण मला हा अधिकार कशामुळे मिळाला हे मला माहीत नाही.

करण जोहरने सांगितले की, यानंतर त्याने शाहरुख खानला सांगितले होते की, तुझा कंठ जास्त दिसतो त्यामुळे तू तुझ्या शर्टची दोन-तीन बटणे उघड. शर्टची बटणे उघड हे ऐकून शाहरुखने होकार दिला आणि म्हणाला, एक मिनिट, आदित्य चोप्राला कॉल करू शकाल का?

आदित्य चोप्रा जेव्हा शाहरुख खानकडे गेला तेव्हा किंग खानने त्याची तक्रार केली आणि विचारले, तो कोण आहे आणि कुठून आला आहे? तो माझ्या कंठाबद्दल का बोलत आहे? किंग खानची तक्रार ऐकल्यानंतर आदित्यने त्याला सांगितले की, करण हा शहरातला राहणारा आहे आणि त्याची बोलण्याची शैलीच अशी आहे. या घटनेनंतर हळूहळू करण आणि शाहरुखच्या मैत्रीत सुधारणा होऊ लागली.

या घटनेनंतर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग निर्माण झाले होते. असे म्हटले जाते की जेव्हा किंग खानने त्याला विचारले की तुला काय करायचे आहे, तेव्हा करण म्हणायचा की त्याला डिझायनर बनायचे आहे, परंतु डिझायनरऐवजी करण जोहर एक यशस्वी चित्रपट निर्माता बनला. करण जोहर आणि शाहरुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 'कभी खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है', 'माय नेम इज खान' आणि 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)

Share this article