Close

समोर आली दिशा परमार आणि राहूल वैद्यच्या बाळाची पहिली झलक..(Rahul Vaidya And Disha Parmar’s Baby Girl’s First-Ever Glimpse)

गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांचा आनंद सध्या द्विगुणित झाला आहे. दोघेही नुकतेच एका गोड मुलीचे आई-वडील झाले आहेत. आयुष्याच्या या नव्या इनिंगच्या सुरुवातीला खूप आनंदी आहेत. चाहते देखील त्यांच्या आवडत्या जोडप्याच्या आनंदाच्या बातमीने खूप खुश आहेत आणि त्यांच्या छोट्या परीची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांची ही इच्छाही पूर्ण झाली आहे.राहुल वैद्यची बहीण श्रुती वैद्य हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राहुल-दिशाच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. कुटुंबातील या नवीन सदस्यावर संपूर्ण कुटुंब प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. फोटोत राहुलची आई आणि नवीन आजी बाळाला प्रेमाने आपल्या मांडीवर घेत आहेत, तर राहुलची बहीण श्रुती वैद्य आणि वडील त्यांच्या जवळ बसून बाळाकडे प्रेमाने पाहत आहेत.

फोटो पाहून अंदाज बांधता येईल की, घरात लहान परी आल्याने संपूर्ण कुटुंब किती आनंदी आहे.फोटो शेअर करताना, श्रुती वैद्यने सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल आभार मानले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे - "तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी सर्वांचे आभार."दिशाने 20 सप्टेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला आणि काल म्हणजेच 23 सप्टेंबरला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

काल राहुल वैद्यचा वाढदिवस होता. नवजात बाळासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी तो खूप उत्साही दिसत होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राहुल आणि दिशा पहिल्यांदाच त्यांच्या मुलीसोबत सार्वजनिकपणे दिसले आणि त्यांच्या भावनाही शेअर केल्या. व्हिडीओ शेअर करून राहुल वैद्यने त्यांच्या घरी झालेल्या बाळाच्या स्वागताची झलकही शेअर केली.'याद तेरी' गाण्याच्या सेटवर राहुल आणि दिशाची प्रेमकहाणी सुरू झाली. राहुलने 'बिग बॉस 14'मध्ये टीव्हीवर दिशाला प्रपोज केले होते. बिग बॉस सोडल्यानंतर त्याच वर्षी त्याने लग्न केले.

Share this article