Close

बिग बॉसच्या नव्या पर्वात ३ अलग अवतारात करणार धम्माल; प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित (Bigg Boss 17 Promo Video Is Out Salman Khan Seen In Different Look)

बिग बॉस १७ चा प्रोमो पाहून व्हाल थक्क... सलमान खान याला 'अशा' अंदाजात पाहिल्यानंतर म्हणाल...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस १७' ची हवा…

‘बिग बॉस’ या वादग्रस्त शोला चाहते कायम उत्तम प्रतिसाद देत असतात. ‘बिग बॉस’ शोच्या १६ सीझननंतर चाहते ‘बिग बॉस १७’ च्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी’ च्या दोन सीझनला देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. आता ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बिग बॉस’ हिंदीचे १७ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत आता अधिकृत घोषणाही झाली आहे. १७ व्या पर्वाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हे पर्व आधीच्या पर्वांपेक्षा नक्कीच वेगळं आणि खास असणार आहे.

‘बिग बॉस १७’ मध्ये कोण स्पर्धक असतील. ‘बिग बॉस १७’ शोची थीम नक्की कोणती असेल… अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये सध्या रंगलेल्या आहेत.

कालच, कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस १७’ शोचा प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये नेहमीप्रमाणे अभिनेता सलमान खान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. प्रोमोमध्ये कधी सलमान शर्ट-पॅंटमध्ये दिसतो, तर कधी टी-शर्टमध्ये समोर येतो. एका लूकमध्ये तर सलमान खान यांनी कुर्ता पायजामा आणि टोपी घातली आहे… अभिनेत्याचे वेग-वेगळे लूक चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

या टीझरमध्ये सलमान खान म्हणतो, “आतापर्यंत तुम्ही बिग बॉसचे फक्त डोळे पाहिले आहेत, आता बिग बॉसचे तीन अवतार पाहायला मिळणार आहेत. दिल, दिमाग आणि दम. सध्या मी एवढेच सांगू शकतो.”

“यावेळी बिग बॉस दाखवणार वेगळे रंग, जे पाहून तुम्ही सर्व थक्क व्हाल. बिग बॉस १७ लवकरच पहा, फक्त कलर्सवर…” अशी कॅप्शनही त्याने दिली आहे.

दरम्यान, बिग बॉस सीझन १७ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमोसोबत शोच्या ग्रँड प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु १५ ऑक्टोबरपासून हा शो सुरू केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. १७ व्या पर्वात कोणते सेलिब्रिटी दिसतील, याबाबत लवकरच माहिती समोर येईल.

Share this article