Close

रोहित शेट्टीच्या आकंठ प्रेमात बुडालेली प्राची देसाई, पण झाले असे काही मोडता मोडता वाचला दिग्दर्शकाचा संसार (Prachi Desai in love with Rohit Shetty but after some time they separate)

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत खळबळ माजवणारी सुंदर अभिनेत्री प्राची देसाईला ओळखीची गरज नाही. जेव्हा तिने टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला तेव्हा तिने तिच्या पहिल्या मालिकेपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. टीव्हीच्या दुनियेत नाव कमावल्यानंतर ती मोठ्या पडद्याकडे वळली, जिथे तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले, पण तिला जे स्टारडम मिळायला हवे होते ते मिळवता आले नाही. 12 सप्टेंबर 1988 रोजी जन्मलेल्या प्राची देसाईला लहानपणापासूनच अभिनयाच्या जगात नाव कमवायचे होते. जाणून घेऊया अभिनेत्रीच्या करिअरशी संबंधित खास गोष्टी...

गुजरातमधील सुरत येथे जन्मलेल्या प्राची देसाईचे शालेय शिक्षण पाचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले. अभिनयाच्या दुनियेत स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्राचीने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केल्यानंतर पूर्ण लक्ष आपल्या करिअरवर केंद्रित केलं. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीत आतापर्यंत अनेक मालिका आणि हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी प्राचीने टीव्ही सीरियल 'कसम से' मधून छोट्या पडद्यावर तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची निरागसता आणि तिच्या व्यक्तिरेखेमुळे तिला प्रत्येक घराघरात लोकप्रियता मिळाली. तीन वर्षांनंतर जेव्हा हा शो बंद झाला तेव्हा तिला खूप ऑफर्स मिळू लागल्या. या शोनंतर ती फक्त 'झलक दिखला जा 2' मध्ये झाली आणि त्या शोची विजेतीही ठरली. याशिवाय ती 'कसौटी जिंदगी की'मध्येही दिसली होती.

प्राची जेव्हा तिच्या डेब्यू सीरियलमध्ये काम करत होती तेव्हा तिला 'रॉक ऑन' चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती. प्राचीने ही ऑफर स्वीकारली आणि 2008 मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो सुपरहिट ठरला, ज्यामुळे अभिनेत्रीच्या करिअरला चालना मिळाली.

आपल्या पहिल्या मालिका आणि पहिल्या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करणाऱ्या प्राचीने नंतर 'लाइफ पार्टनर', 'तेरी मेरी कहानी', 'रॉक ऑन 2', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'अझहर' सारखे चित्रपट केले. तर 'कार्बन', 'आई मी और मैं' सारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या 'फोरेन्सिक' चित्रपटात ती शेवटचा दिसली होती. अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करूनही, अभिनेत्रीला योग्य ते स्टारडम मिळाले नाही.

अभिनयासोबतच प्राची देसाईने तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत राहिली आहे. तिचे नाव विवाहित दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत जोडले गेले होते, असे म्हटले जाते की दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. एक वेळ अशी आली जेव्हा रोहित प्राचीसाठी पत्नी माया आणि मुलांना सोडायलाही तयार होता, पण काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि रोहित शेट्टीचे लग्न तुटण्यापासून वाचले. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)

Share this article