चीज उत्तपम
साहित्य : 3 कप तांदूळ, प्रत्येकी 1-1 कप उडदाची डाळ आणि उकडीचे तांदूळ, अर्धा कप दही, चवीनुसार मीठ, 1 कांदा, 1 सिमला मिरची, 1 गाजर (तिन्ही बारीक चिरून घ्या) , 1 टीस्पून ऑरिगॅनो, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, पाव कप मक्याचे दाणे, चवीनुसार पिझ्झा स्प्रेड, 4-5 चीज क्यूब्स, तेल.
कृती : तांदूळ आणि डाळ 7-8 तासांकरिता भिजवून ठेवा. नंतर त्यामधील पाणी काढून मिक्सरमधून वेगवेगळे वाटून घ्या. नंतर दोन्ही तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं वाटण एकत्र करा. या बॅटरमध्ये दही घालून व्यवस्थित फेटा. आता हे बॅटर 6-7 तासांकरिता झाकून ठेवा. नंतर या पेस्टमध्ये सर्व चिरलेल्या भाज्या घाला. मीठ घाला. नंतर नॉनस्टिक तव्यावर तेल लावून 1 टेबलस्पून बॅटर त्यावर पसरवा. मंद आचेवर ते चांगले शेकून घ्या. त्यावर पिझ्झा स्प्रेड पसरवा आणि वरून चीज किसून घाला. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स वरून भुरभुरा. चीज वितळले की गरमागरम चीज उत्तपम सर्व्ह करा.