गेल्या काही दिवसांपासुन जिनिलीया देशमुख गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. एका इव्हेंटमध्ये जिनिलीया आणि रितेश सहभागी झाले होते. त्यावेळी जिनिलीयाकडे बघून अनेकांनी ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरु केल्या.
जिनिलीया तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली. बायको गरोदर असल्याच्या या सर्व चर्चांवर रितेशने अखेर मौन सोडलं आहे.
जिनिलीया खरंच गरोदर आहे का? रितेश म्हणतो, "अजुन २ - ३ मुलं असली तरी मला काही हरकत नाही, पण दुर्देवाने या बातमीत काही तथ्य नाही."
अशाप्रकारे रितेशने जिनिलीया गरोदर नाही, हे स्पष्ट केलंय.
गेल्या २ - ३ दिवसांपासून जिनिलीया तिसऱ्यांदा गुड न्युज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एका फॅशन इव्हेंटमध्ये जिनिलीया आणि रितेश या दोघांचा फोटो बातमीचा विषय झाला आहे. या दोघांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण आता रितेशने स्पष्टच सांगून या सर्व अफवा असल्याचं सांगितलंय.
बॉलीवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून रितेश आणि जिनिलीयाकडे पाहिले जाते. २ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जेनेलियाचे लग्न झाले. २०१४ मध्ये त्यांना मुलगा झाला त्याचे नाव रियान, त्यानंतर २०१६ मध्ये जेनेलिया दुसऱ्यांदा आई झाली.
या वर्षी रितेश - जिनिलीयाचा वेड सिनेमा खूप गाजला. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. रितेश - जिनिलीयाला पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.