'तारक मेहता का उल्टा चष्मा' द्वारे घराघरात लोकप्रिय झालेली रीटा रिपोर्टर उर्फ प्रिया आहुजा हिने नुकताच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांचा अंदाज बांधला जात आहे की रिटा रिपोर्टर बनलेली प्रिया आहुजा पुन्हा एकदा आई होणार आहे.
प्रिया आहुजा हे भारतीय टेलिव्हिजनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका साकारून अभिनेत्रीला ही ओळख मिळाली. मात्र, अभिनेत्रीने काही कारणांमुळे या शोला रामराम केला आहे.
प्रिया स्टार प्लसच्या लोकप्रिय शो 'गुम है किसी के प्यार में'मध्ये मॅडी उर्फ मधुराच्या भूमिकेत दिसली होती. घराघरात नाव बनलेल्या प्रिया आहुजाने नुकताच एक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
प्रियाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये असाच एक फोटो शेअर केला आहे, जो तिने तिच्या पहिल्या गरोदरपणाच्या वेळी पोस्ट केला होता आणि ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आणि आता हा फोटो पुन्हा पाहिल्यानंतर चाहत्यांना वाटत आहे की प्रिया दुसऱ्यांदा आई होणार आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये हे जोडपे बाळाच्या शूजची जोडी हात धरुन उभे आहेत, परंतु त्यांचे चेहरे दिसत नाहीत. प्रियाने या पोस्टमध्ये तिच्या पतीलाही टॅग केले आहे.
व्हायरल झालेला हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचा अंदाज आहे की प्रिया आहुजा आणि मालव राजदा पुन्हा एकदा आईबाबा होणार आहेत. तथापि, या जोडप्याने अद्याप दुस-यांदा पालक होणार असल्याच्या अफवेला दुजोरा दिलेला नाही.