Close

बॉलिवूड कलाकारांची उणीधूणी काढणाऱ्या कंगणाने जवानसाठी किंग खानचे केले चक्क कौतुक, पाहा काय म्हणाली अभिनेत्री (Kangana Ranaut Praises Shah Rukh Khan, Calls Him ‘The Cinema God’)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. कोणताही मुद्दा असो, ती उघडपणे बोलते. पण काहीवेळेस उघडपणे बोलण्यामुळे सेलिब्रिटीं अडचणीत येतात. कोण ना कोण बॉलिवूड सेलिब्रिटी कंगणाच्या निशाण्यावर असतात. बॉलिवूडमधील अभिनेत्याचे तिने कौतुक करणे हे फार क्वचितच घडते.  परंतु यावेळी तिचा सूर बदललेला दिसतो. बॉलिवूडच्या बादशहाच्या स्तुतीसाठी तिने अनेक स्तुतीसुमनं उधळली आहेत.

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉलिवूड ओपनर बनला आहे आणि बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडत आहे. जवानाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी देखील शाहरुख खानच्या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आणि आता कंगना रणौतने देखील शाहरुख खानचा जवान पाहिला आहे आणि तिची प्रतिक्रिया देखील आली आहे. कंगनाला हा चित्रपट इतका आवडला आहे की तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक नोट लिहिली आहे आणि किंग खानची स्तुती केली आहे.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर 'जवान'चे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, "नव्वदच्या दशकातील अंतिम प्रेमी बॉय बन. नंतर चाळीशी ते पन्नासच्या वयोगटातील प्रेक्षकांना आपला चाहता बनवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. आणि आता वयाच्या 60 व्या वर्षी (अंदाजे ) हा सर्वोत्कृष्ट मास सुपरहिरो म्हणून उदयास आला आहे. वास्तविक जीवनातील सुपरहिरो. मला आठवते की लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, त्याच्या निवडीची खिल्ली उडवायचे, परंतु त्याचा संघर्ष सर्व कलाकारांसाठी एक मास्टर क्लास आहे जे दीर्घ कारकीर्दीचा आनंद घेत आहेत परंतु त्यांना पुन्हा प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याची आवश्यकता आहे."

कंगनाने पुढे लिहिले- "शाहरुख खान हा सिनेमाचा देव आहे ज्याची देशाला गरज आहे. केवळ मिठी किंवा डिंपलसाठीच नाही, तर जगाला वाचवण्यासाठीही. तुझ्या समर्पणाला, मेहनतीला आणि नम्रतेला सलाम, किंग खान." याशिवाय कंगनाने जवानसाठी संपूर्ण टीमचे अभिनंदनही केले आहे.

शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची चर्चा, चित्रपटाचा डंका सगळीकडे वाजत आहे. जवान ने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडले आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 75 कोटींची कमाई केली आहे.

Share this article