नयनतारा आणि तिचा पती दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांने त्यांच्या मुलांचे जन्माष्टमी साजरी करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोत मुलं खूप सुंदर दिसत आहेत. चाहतेही त्यांच्या मुलांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
विघ्नेश शिवन आणि नयनतारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. विघ्नेशने इन्स्टाग्रामवर त्याच्या जुळ्या मुलांचा म्हणजेच उईर आणि उलाग यांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो कृष्ण जयंती म्हणजेच जन्माष्टमी उत्सवादरम्यान क्लिक करण्यात आला आहे. फोटोमध्ये दोन्ही मुले धोतर घालून देवाऱ्या समोर बसलेली दिसत आहेत.
या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'आमच्या दोन कृष्णांसोबत. अशा अनेक सुंदर, आशिर्वादित क्षणांची अशी धन्य कृष्ण जयंती. आमच्या Uyir आणि Ulag वर खूप प्रेम. कृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, आशा आहे की प्रत्येकाची जयंती कुटुंब आणि मित्रांसोबत छान जावो.
विघ्नेशची ही पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करताना नयनताराने लिहिले, 'या आशीर्वादासाठी मी नेहमीच देवाची ऋणी आहे. विकी, उईर, उलाग.