बॉलिवूडची बिल्लो राणी म्हणजेच बिपाशा बसू तिचा पती करण सिंग ग्रोवर आणि मुलगी देवीसोबत तिच्या कौटुंबिक जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. या दोघांच्या लग्नाला सात वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण जेव्हा जेव्हा या जोडप्याला विचारले जाते की घरात सर्वात जास्त कोणाचे राज्य चालते, तेव्हा अभिनेता नेहमी बिपाशा बसू घरावर वर्चस्व गाजवते असे उत्तर देतो. पत्नी बिपाशा बसूच्या रागाला तो खूप घाबरत असल्याचे खुद्द अभिनेत्याने एका शोमध्ये सांगितले होते. यासोबतच या जोडप्याने त्यांच्या बाँडिंगबद्दलही सांगितले. चला जाणून घेऊया.
असे म्हटले जाते की लग्नानंतर दोघेही एकत्र घर चालवतात, मात्र बिपाशाचा दबदबा कायम आहे. करण सिंग ग्रोव्हर त्याच्या कुटुंबात खूप आनंदी असला तरी कधी-कधी बिपाशा त्याच्यावर रागावते तेव्हा अभिनेता घाबरून जातो. खुद्द अभिनेत्याने एका शोमध्ये विनोदी पद्धतीने याचा उल्लेख केला होता.
जेव्हा करण आणि बिपाशा एका शोमध्ये गेले होते तेव्हा अभिनेत्याने सांगितले होते की त्याचे लग्न बंगाली पद्धतीने झाले आहे. अशा परिस्थितीत बिपाशाचे पंडितजी त्याला करण सिंग ग्रोवरऐवजी 'करण सिंह गोबर' म्हणाले होते. यासोबतच पत्नी बिपाशाच्या रागामुळे तो खूप हैराण झाला असल्याचे म्हणाला.
करणचे म्हणणे ऐकून बिपाशाने असेही म्हटले होते की, मी बंगालची आहे, बंगाल टायग्रेस… बिपाशाने हे सांगितल्यानंतर करणने सांगितले होते की, बिपाशा फार काही करत नाही, ती फक्त एवढंच म्हणते की ते इथे होतं तर तिथे कसं गेलं? तू हे करतोस, तू असे का केलेस, वगैरे वगैर...
यानंतर बिपाशा म्हणाली होती की, फक्त एक नजर टाका बाकी सर्व गोष्टी आपोआप जागी जातात. बिपाशाने हेही सांगितले की ती रागवल्यावर पती करणशी कशी वागते ? अभिनेत्रीच्या मते, सायलेंट ट्रिटमेंट हे एक असे शस्त्र आहे जे सर्वात प्रभावी असते, म्हणून जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा गप्प बसा आणि काय होते ते पहा
करणला पत्नी बिपाशाच्या रागाची भीती वाटत असली तरी दोघांमध्ये खूप चांगले बाँडिंग आहे. 30 एप्रिल 2016 रोजी करण आणि बिपाशाने एकमेकांसोबत लग्न केले होते. 'अलोन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जात आहे. बिपाशाचे हे पहिले तर करण सिंग ग्रोव्हरचे तिसरे लग्न आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)