Close

अभिनेत्री, लेखिका व डिझायनर श्वेता नंदा यांच्या हस्ते ‘कलयुग ३.०’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन (Artist, Author And Designer Shweta Nanda Inaugurates ‘Kaliyug 3.0’Art Exhibition)

कलाकार मनसा कल्याण यांच्या ऍक्रेलिक चित्रांची सीरिज 'कलियुग' ची तिसरी आणि अंतिम आवृत्ती मुंबईत लॉन्च केली गेल्याची घोषणा करण्यात आली आहे. लेखिका आणि स्तंभलेखिका श्वेता बच्चन नंदा यांनी मुंबईत कमलनयन बजाज हॉल अँड आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आलेल्या या ५ दिवसांच्या प्रदर्शनाचे उदघाटन केले.

श्वेता बच्चन नंदा, लेखिका, कलाकार-डिझायनर यांनी आपल्या भाषणात सांगितले,"मंत्रमुग्ध करणारी ‘कलियुग ३.0’ सीरिज पाहताना, मला कलेच्या शाश्वत सामर्थ्याची आठवण होते आहे, असे सामर्थ्य ज्याद्वारे कला सर्व सीमा ओलांडून आपल्या अस्तित्वाच्या गाभ्याला स्पर्श करते. मनसा कल्याणचे प्रभावी स्ट्रोक आणि सखोल भावना आपल्याला जाणीव करून देतात की सर्जनशीलता ही एक वैश्विक भाषा आहे जी आपल्या सर्वांना एकत्र जोडते. हे प्रदर्शन कलाकाराच्या उल्लेखनीय प्रवासाचा आणि स्वतःच्या कलेच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याच्या तिच्या क्षमतेचा पुरावा आहे. या असामान्य कामगिरीबद्दल मनसाचे मनःपूर्वक अभिनंदन."

कलियुग सीरिजबद्दल चित्रकार मनसा कल्याण यांनी सांगितले, "सध्याच्या युगात माणुसकीला एकमेकांमध्ये गुंतलेल्या अनेक जागतिक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.  या पार्श्वभूमीवर मी जग आणि दैनंदिन आयुष्यातील सौंदर्य प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे, असे सौंदर्य जे आजच्या पिढीकडून स्वतःच्या धकाधकीच्या जीवनात दुर्लक्षिले जात आहे. या चित्रांमधून मी परिवर्तनाची शक्ती दाखवू इच्छिते, अशी शक्ती जी समुदाय आणि व्यक्तींच्या सामूहिक विवेकामध्ये आहे."

कलियुग ३.० म्हणजे कलाकाराच्या जगाविषयीच्या दृष्टीकोनाचे विस्तारित रूप आहे. एका वास्तविक अनुभवाच्या माध्यमातून आजच्या पिढीला आत्मपरीक्षणासाठी उत्तेजित करावे आणि परिवर्तनाला चालना दिली जावी हा यामागचा उद्देश आहे. कला प्रदर्शनासह विक्रीतून मिळणारी संपूर्ण रक्कम अक्षय पात्र फाउंडेशनला दान केली जाणार आहे.

Share this article