मखाना-बटाटा पॅटिस
साहित्य : 4 बटाटे उकडून, सालं काढून स्मॅश केलेले, 1 कप भाजून बारीक केलेले मखाने, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 टीस्पून भरडलेली बडीशेप, 2 टेबलस्पून भाजून जाडसर वाटलेले शेंगदाणे, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, स्वादानुसार सैंधव मीठ, तेल.
कृती : एका पॅनमध्ये थोडं तूप घालून, त्यात मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. नंतर जाडसर वाटून घ्या. उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. त्यात तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घालून एकजीव मिश्रण तयार करून घ्या. या मिश्रणाला मोठ्या पेढ्यांचा आकार द्या. पॅनमध्ये थोडं तेल गरम करून, त्यात पॅटिस दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्या.
गरमागरम मखाना-बटाटा पॅटिस हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.