Close

१७ वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार शाहरुख आणि बिग बी? काय असेल नवा प्रोजेक्ट… चित्रपट की आणखी काही? (Amitabh Bachchan And Shah Rukh Khan To Share Screen After 17 Years? )

अमिताभ बच्चन आणि बादशाह म्हणजेच शाहरुख खान यांनी सर्वात शेवटी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या बॉलिवूडच्या सर्वात उत्तम चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहेत.

चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन लवकरच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या नावाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

एका एंटरटेनमेंट पोर्टलच्या इन्स्टाग्राम हँडलवर शाहरुख खान आणि बिग बी यांचा एकत्र फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे - डॉन 1 आणि डॉन 2 दोघेही 17 वर्षांनंतर एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. जवळच्या सूत्रांनुसार, अशीही माहिती मिळाली आहे की एका प्रोजेक्टवर काम सुरू आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. मात्र अद्याप या प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, डॉन 3 मध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान विशेष भूमिकेत दिसतील आणि रणवीर डॉन 3 च्या भूमिकेत त्यांचा वारसा पुढे नेईल असा अंदाज नेटिझन्स करत आहेत.

शेअर केलेल्या या फोटोवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. कुणीतरी लिहिले आहे – डॉन-३ मध्ये तिन्ही डॉन एकत्र येत आहेत का, तर दुसर्‍या युजरने कमेंट करून विचारले आहे की करण जोहरचा कभी खुशी कभी गमचा सीक्वल बनवण्याची योजना आहे का?

दोन्ही सुपरस्टार्सना एकत्र पाहून अभिनेत्यांचे चाहते खूपच आश्चर्यचकित झाले आहेत आणि किंग खान त्याच्या आगामी 'जवान' चित्रपट कौन बनेगा करोडपतीचे प्रमोशन करणार आहे का, असा प्रश्न विचारत आहेत.

Share this article