Close

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदाही मराठी चित्रपटांचा डंका (69th National Film Awards)

मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल २४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे करण्यात आली. यंदा ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारवर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने नाव कोरलं आहे. तसेच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या विभागात ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदाही मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळत आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं. तसेच ‘गोदावरी’साठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये काश्मीर फाइल्ससाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना जाहीर झाला आहे.

कोणाला मिळाला कुठला पुरस्कार? पाहा यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट - 'रॉकेट्री : द नांबी इफेक्ट'

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जून (पुष्पा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट गायिका - श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक - गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा - सरदार उधम

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा - एकदा काय झालं

सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी - आरआरआर

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - आरआरआर

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - पुष्पा

सर्वोत्कृष्ट एडिटर - गंगूबाई काठियावाडी

विजेत्यांचे अभिनंदन!

Share this article