बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा नवा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या काही चाहत्यांना त्याचा हा नवीन लूक खूप आवडला आहे. तर काहीजण मात्र त्याच्या या लूकमुळे नाराज असून त्याला ट्रोल करत आहेत.
सलमान खान जेव्हा काही नवीन करतो तेव्हा तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. अलीकडेच सलमान खान मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट बास्टनच्या बाहेर स्पॉट झाला होता. पापाराझीने त्याचे काही फोटो क्लिक केले. यावेळी सलमान खानचा बदललेला लूक पाहायला मिळाला.
काल रात्री सलमान खान मुंबईतील वरळी येथील बास्टन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. यादरम्यान सलमान खान नव्या बाल्ड लूकमध्ये दिसला. यावेळी त्याने ऑल ब्लॅक लूक केला होता.
अभिनेत्याने काळ्या पोशाखासह त्याच्या हातात त्याचे ट्रेडमार्क ब्रेसलेट घातले होते. पण सलमान खानच्या नव्या बाल्ड लूकने सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं.
सल्लू मियाँचा हा टक्कल असलेला लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काहींना त्याचा लूक खूप आवडला तर काहींनी या अभिनेत्याला त्याच्या टक्कल पडलेल्या लूकसाठी खूप ट्रोल केले.