Close

मंदिरात तरी दिखाऊपणा नको.. तेजस्वीच्या कपड्यांवरुन भडकले चाहते  (Tejasswi Prakash Gets Brutally Trolled For Wearing Ripped Jeans In Temple)

टीव्हीची सर्वात क्यूट आणि प्रसिद्ध नागिन तेजस्वी प्रकाशची फॅन फॉलोइंग खूप चांगली आहे. लोक तिच्यावर खूप प्रेम करतात. याशिवाय तिची करण कुंद्रासोबतची जोडीही चाहत्यांना खूप आवडते. मात्र यावेळी अभिनेत्रीला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अभिनेत्री नुकतीच मंदिरात गेलेली. पण तिच्या तेव्हाच्या लूकमुळे लोक तिच्यावर चांगलेच संतापले,

तेजस्वी शनिवारी मुंबईच्या शनी मंदिरात पोहोचली, पण तिने तेव्हा फाटलेली जीन्स आणि टी-शर्ट घातले होते. तेजस्वीचा लूक खूपच साधा होता. तेजस्वी केसांना तेल  आणि चेहऱ्यावर मेकअप न करताच बाहेर पडलेली.  परंतु त्यावेळी तिने फाटलेली जीन्स घातलेली. तिचे असे फाटके कपडे घालून मंदिरात जाणे चाहत्यांना आवडले नाही. तिने इथे योग्य कपडे घातले असते तर काय झाले असते, अशी प्रतिक्रिया ते देऊ लागले. याशिवाय पापाराझींच्या उपस्थितीनेही लोक संतप्त झाले होते. मंदिर हे श्रद्धेचे ठिकाण आहे, त्यामुळे येथे दिखाऊपणा होता कामा नये, असे त्यांचे म्हणणे आहे.

चाहते कमेंटमध्ये ती लक्षवेधून घेण्याचा प्रयत्न करतेय असे म्हणत आहे. तर काहींचे म्हणणे आहे की जर तिने स्वतः पॅप्सला फोन केला असता तर ती चांगली तयार आली असती.

काही लोकांनी तिच्या तेल लावलेल्या केसांवरही कमेंट करायला सुरुवात केली की आंटी हेअर एक्स्टेंशन लावायला विसरली… लोक असेही म्हणू लागले की ती डेली सोप अभिनेत्री आहे पण बॉलीवूड अभिनेत्रीसारखी वागते, म्हणूनच ती सगळीकडे पॅप्सला बोलवते.

Share this article