Close

चायनीज डोसा आणि शेजवान चटणी (Chinese Dosa And Schezwan Chutney)

चायनीज डोसा


साहित्य : 1 ग्लास तांदूळ, पाव ग्लास उडीद डाळ, 1 लहान वाटी पोहे, पाव टीस्पून मेथी दाणे, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल वा तूप.
सारणासाठी : 1 कप शिजवलेले नूडल्स, 1 वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, 1 वाटी बारीक चिरलेली कोबी, 2 टेबलस्पून शेजवान चटणी.
कृती : डोशाचे पीठ तयार करून घ्या. सारणासाठीचे सर्व साहित्य एकत्र करून एकजीव मिश्रण तयार करा.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यास थोडे तेल लावून, त्यावर 1 डाव डोशाचे पीठ घालून पातळ पसरवा. पिठाच्या कडेने तेल वा तूप सोडा. डोशाच्या मध्यभागी सारण पसरवून 2 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. नंतर डोसे दोन्ही बाजूंनी दुमडून कुरकुरीत करून घ्या. गरमागरम चायनीज डोसा शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.

शेजवान चटणी

साहित्य : प्रत्येकी 10 लाल मिरच्या व लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, पाव कप (चिरलेला) पातीचा कांदा, प्रत्येकी 1 टेबलस्पून सोया सॉस व कॉर्नफ्लोअर, प्रत्येकी 2 टेबलस्पून तेल व टोमॅटो केचअप, चिमूटभर अजिनोमोटो, स्वादानुसार मीठ.
कृती : लाल मिरची साधारण दीड तास भिजत ठेवा. एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर, अर्धा कप पाणी, सोया सॉस, टोमॅटो केचअप व अजिनोमोटो चांगले एकत्र करून घ्या. लाल मिरची व थोडे आले-लसूण एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या. उर्वरित आले-लसूण बारीक चिरून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मिरची पेस्ट व उर्वरित आले-लसूण घालून 2 मिनिटे परतवा. त्यात मीठ घालून 2-3 मिनिटे परतवा. नंतर कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घालून 2-3 मिनिटे ढवळा. शेवटी पातीचा कांदा एकत्र करून सर्व्ह करा.

Share this article