Close

नवी मालिका ‘राणी मी होणार’ मध्ये ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणांची वेगळी कथा (In New Marathi Series “Ranee Mee Honar”, The Story Revolves Round Young Beauty Parlour Artists)

मराठी मालिकांमध्ये आता वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. त्याची चुणुक ‘राणी मी होणार’ या नव्या मालिकेत दिसते आहे.

‘राणी मी होणार’ चा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून त्यामध्ये सिद्धार्थ खिरीद व संचिता कुलकर्णी ही जोडी ब्युटी पार्लरमध्ये काम करताना दिसत आहे. सिद्धार्थ हा मल्हार नावाचा हेअर स्टायलिस्ट झाला आहे, तर संचिता नेल आर्टिस्ट आहे. आयुष्य बदलविणाऱ्या, स्वप्नांची उमेद बाळगणाऱ्या ‘ती’ ची कहाणी या मालिकेत दिसेल. ब्युटी सलोनच्या पार्श्वभूमीवर ही कथा उलगडणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने सिद्धार्थ व संचिता यांनी पार्लरमध्ये जाऊन काही पत्रकार व इतर ग्राहकांचे ग्रुमिंग केले. नेल आर्ट, आय मेकअप, हेअर स्टाईल अशा सलोन सर्व्हिस त्यांनी दिल्या. मालिकेच्या प्रोमोमध्ये ते हेच काम करताना दिसत आहे.

‘राणी मी होणार’ ही मालिका येत्या सोमवार पासून सोनी मराठी चॅनलवर रात्री आठ वाजता, दररोज दिसणार आहे,

Share this article