बॉलिवूडचे स्टार कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे नेहमी चर्चेत असतात. सध्या ह जोडपं त्यांची लाडकी लेक देवीमुळे चर्चेत असतात. देवी देखील तिच्या जन्मापासूनच लाईमलाईटमध्ये आहे. बिपाशा लेकीबद्दल अनेक अपडेट चाहत्यांसोबत शेयर करत असते. बिपाशाची लेक नावाला शोभेल अशी शांत आणि संस्कारी मुलगी आहे.
निसर्गाचे सौंदर्य दाखवण्यापासून, हिंदू धर्मातील पौराणिक कथा सांगण्यापर्यंत, बिपाशा आणि करण देवीला नेहमीच काही ना काही चांगल्या गोष्टी शिकवत असतात. आता नुकतच बिपाशाने देवीचा झोपतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.
या व्हिडिओमध्ये देवीच्या 'बेडटाइम रूटीन'ची झलक दिसते. बिपाशा बसूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण सिंग ग्रोव्हर झोपण्यापूर्वी आपली लेकीला हनुमान चालीसा ऐकवताना दिसतोय. देवी देखील शांतपणे हनुमान चालीसा ऐकते आणि वडिलांच्या चेहऱ्याला स्पर्श करते आणि आवाज करताना दिसतेय.
बिपाशा बासूने हा व्हिडिओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की "बेडटाइम विथ पापा, मम्मा आणि देवी"
सध्या देवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी आणि कलाकार तिचं कौतुक करत आहेत. तिच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी बिपाशाच्या आणि करणने दिलेल्या संस्काराचे कौतुक करत आहे.
काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या मुलीवर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्टची सहा तासांची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला होता. देवीच्या जन्मानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले की त्यांच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्रे आहेत. त्यानंतर ती तीन महिन्याची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये करण आणि बिपाशाच्या जीवनात देवीचे आगमन झाले. तेव्हापासून दोघेही खूप आनंदी आहेत आणि काही दिवसांपूर्वी, देवी ९ महिन्यांची झाली. त्याचे फोटो देखील बिपाशाने शेयर केले होते.