अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाची स्पर्धा सनी देओलच्या 'गदर 2' आणि रजनीकांतच्या 'जेलर'शी आहे, पण तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलीच पकड धरली आहे. एकापाठोपाठ 5 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर 'OMG 2' अक्षयसाठी लकी ठरत आहे. या चित्रपटात त्याला भगवान शंकराच्या दूताची भूमिका साकारताना पाहायला मिळते. अक्षय हा सर्वात महागडा अभिनेता असला तरी या चित्रपटासाठी त्याने एक रुपयाही घेतलेला नाही.
या चित्रपटाच्या बजेटबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. OMG 2 150 कोटी रुपयांना बनवण्यात आल्याचे बोलले जात आहे. केप ऑफ गुड फिल्म्स आणि बकाओ फिल्म्ससह चित्रपटाची सहनिर्मिती करणारे वायाकॉम 18 स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) अजित अंधारे यांनी या चर्चेचे खंडन केले.
त्यांनी सांगितले की, अक्षयने या चित्रपटासाठी एक रुपयाही घेतला नाही. ते पुढे म्हणाले, "आम्ही 'OMG', 'स्पेशल 26' आणि टॉयलेट: एक प्रेम कथा यांसारख्या चित्रपटांपासून पूर्णत: त्यांच्यासोबत आहोत. आम्हाला नेहमीच काहीतरी अर्थपूर्ण दाखवायचा असते" स्वत:ला सर्जनशील आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतवणाऱ्या अक्षयशिवाय हा धोका पत्करणे अशक्य असल्याचे अंधारे यांनी यावेळी सांगितले तसेच या चित्रपटासाठी अक्षयने एक रुपयाही मानधन घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले.