टीव्ही क्वीन एकता कपूरची नागिन सुरभी चंदनाचे नाव छोट्या पडद्यावरील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सुरभीला लोक घराघरात ओळखतात, पण सुरभी एकदा टीव्हीवरील हिट सीरियल 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये दिसली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे. इतकंच नाही तर ती या शोमध्ये जेठालालवर लाईन मारतानाही दिसली होती. सुरभी आज ज्या टप्प्यावर पोहोचली आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कठोर परिश्रम आणि समर्पणानंतर तिला इश्कबाजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे सुरभीच्या करिअरला खर्या अर्थाने ओळख मिळाली.
सुरभी चंदनाचे चाहते तिला 'इश्कबाज'साठी ओळखतात, पण सुरभीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्येही काम केले आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. खरंतर सुरभीने या शोमध्ये कॅमिओ केला होता. तिने शोमध्ये स्वीटीची भूमिका साकारली होती, जी काही काळ जेठालालच्या दुकानात काम करताना दिसली.
शोमध्ये स्वीटीने जेठालालकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न करते आणि त्याच्यावर आरोपही करते. तारक मेहताच्या एका एपिसोडमध्ये असे दाखवण्यात आले होते की, जेठालालच्या दुकानात काम करणारी स्वीटी पैसे उकळण्यासाठी जेठालालचा फोटो एडिट करते आणि आपल्यासोबत अफेअर असल्याचा आरोप करते, पण टपूने आपले वडील जेठालाल यांच्या आरोपांमागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो स्वीटीचे रहस्य सर्वांसमोर उघड करतो.
तारक मेहतामध्ये जेठालालला आकर्षित केल्यानंतर सुरभीने 'एक नणंद की खुशी की चाबी... मेरी भाभी'मध्ये छोटी भूमिका केली. 'आहट'मध्येही ती एपिसोडिक भूमिकेत दिसली आहे. अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका आणि कॅमिओ करणाऱ्या सुरभीला अखेर २०१६ मध्ये 'इश्कबाज' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील सुरभीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली आणि ती घराघरात लोकप्रिय झाली.
सुरभीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'इश्कबाज' मिळाल्यानंतरही तिला जवळपास एक वर्ष संघर्ष करावा लागला, कारण त्या शोचे शूटिंग सुरू होत नव्हते. एवढ्या प्रदीर्घ प्रतिक्षेचा तो काळ तिच्यासाठी खूपच निराशाजनक होता. जवळपास वर्षभराच्या संघर्षानंतर शोचे शूटिंग सुरू झाले आणि जेव्हा तो टेलिकास्ट झाला तेव्हा लोकांना तो खूप आवडला. या मालिकेतील नकुल मेहतासोबत सुरभी चंदनाची जोडी घरोघरी गाजली.
विशेष म्हणजे 'इश्कबाज' नंतर सुरभीने 'संजीवनी'मध्येही काम केले होते, मात्र हा शो प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. यानंतर तिला एकता कपूरच्या 'नागिन 5' शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि शरद मल्होत्रासोबत सुरभी चंदनाच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या ती अभिनयासोबत होस्टिंग करत आहे. तिने 'हुनरबाज: देश की शान' हा शो होस्ट केला होता. ती शेवटची 'शेरदिल शेरगिल' या मालिकेत दिसली होती.