साधा डोसा
साहित्य : 1 ग्लास तांदूळ, पाव ग्लास उडीद डाळ, 1 लहान वाटी पोहे, पाव टीस्पून मेथी दाणे, आवश्यकतेनुसार तूप वा तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : तांदूळ, उडीद डाळ व मेथी दाणे एकत्र 6-7 तास भिजत ठेवा. पोहे अर्धा तास भिजत ठेवा. भिजवलेले तांदूळ, उडीद डाळ, पोहे व मेथी दाणे एकत्र बारीक वाटून घ्या. त्यात थोडे मीठ एकजीव करून 7-8 तासांकरिता झाकून ठेवून द्या. नॉनस्टिक तवा गरम करून त्यास तेल लावून त्यावर 1 डाव डोशाचे पीठ घाला. शक्यतोवर पातळ पीठ पसरवून डोसा पातळ करा. डोशाच्या कडेला तेल वा तूप सोडून, तो कुरकुरीत होऊ द्या. हा डोसा बेसन करीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied