अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तरी देखील तिच्या चाहत्यांची संख्या जराही कमी झालेली नाही. काही नाही तर तिच्याकडे असलेलं सौंदर्याचं ऐश्वर्य तर नेहमीच चर्चिलं जातं. तुम्हाला माहीत आहे का की 'जोधा अकबर' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी ५० बॉडीगार्ड्स तैनात होते. तुम्हाला काय वाटतं तिला एवढ्या बॉडीगार्डस्ची गरज का पडली असेल? त्यामागचं कारण देखील मोठंच आहे...
'जोधा अकबर' सिनेमात ऐश्वर्या राय आणि अभिनेता ऋतिक रोशन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात ऐश्वर्या हिने राणी जोधा यांच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला होता. सिनेमातील ऐश्वर्याच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं ज्यामुळे सिनेमानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
सिनेमात ऐश्वर्या रायचं सौंदर्य वाढवण्यासाठी तिला नकली नव्हे तर खऱ्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवलं होतं. अभिनेत्रीचे सिनेमातील फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सिनेमात ऐश्वर्यासाठी जवळपास २०० किलो सोन्याचे दागिने वापरण्यात आले होते. त्या दागिन्यांचं वजन सुमारे ४०० किलो होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दागिने तयार करण्यासाठी ७० कारागिरांचा मोलाचा वाटा होता. एवढंच नाही तर त्यावेळी ऐश्वर्याच्या सुरक्षेसाठी तब्बल ५० बॉडीगार्डस तैनात होते.
ऐश्वर्याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकतेच ती Ponniyin Selvan २ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.