हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मोठी कन्या जान्हवी कपूर हिने फार कमी कालावधीत बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. 2018 साली आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या जान्हवीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या टॅलेंटच्या जोरावर तिने वेगळे स्थान मिळवले. जान्हवीने 2022 मध्ये स्वत:साठी एक आलिशान डुप्लेक्स खरेदी केले होते, ज्याची किंमत 65 कोटी रुपये आहे. जान्हवीने चाहत्यांना तिच्या आलिशान घराची झलकही दाखवली आणि जेव्हा तिने तिच्या मास्टर बेडरूमची झलक दाखवली तेव्हा तिने सांगितले की तिच्या बाथरूममध्ये कोणतेही कुलूप नाही. यासोबतच अभिनेत्रीने याचे कारणही सांगितले.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नसली तरी जान्हवी कपूरला तिच्या आईची आठवण येते. ती अजूनही तिच्या आईचे काही शब्द पाळते. वास्तविक, श्रीदेवीने तिच्या बाथरूममध्ये लॉक लावण्यास नकार दिला होता. जेव्हा जान्हवीने तिच्या मास्टर बेडरूमची झलक दाखवली तेव्हा ती म्हणाली की मला आठवते की माझ्या आईने माझे बाथरूम लॉक करण्यास नकार दिला होता, कारण तिला वाटले की मी बाथरूममध्ये जाऊन मुलांशी बोलेन.
जान्हवीच्या म्हणण्यानुसार, तिला कधीही तिच्या बाथरूममध्ये लॉक लावण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे आज तिची आई नसतानाही जान्हवीने तिच्या बाथरूममध्ये लॉक बसवले नाही. तिच्या आईने बाथरूमला कुलूप लावण्यास नकार तर दिलाच, पण जान्हवीला त्यांनी व्हॅक्सही करु दिले नाही,. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, एकदा तिने तिच्या आईसोबत व्हॅक्सशिवाय फोटोशूट केले होते.
जान्हवीवर विश्वास ठेवला तर ती तिच्या आईच्या खूप जवळ होती आणि तिची आई सुद्धा तिच्यावर जीव ओवाळायची. अभिनेत्रीने सांगितले की, जोपर्यंत श्रीदेवी तिला थोपटत नाही तोपर्यंत तिला झोप येत नव्हती. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे निधन झाले. आई अचानत गेल्याने जान्हवी पूर्णपणे तुटली होती.
विशेष म्हणजे, श्रीदेवीच्या निधनानंतर लगेचच जान्हवीने बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. जान्हवीने 2018 मध्ये 'धडक' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते, ज्यासाठी तिने 60 लाख रुपये फी घेतली, परंतु आता जान्हवी एका चित्रपटासाठी सुमारे 5 कोटी रुपये फी घेते. ती शेवटची बवाल चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या सोबत वरुण धवन दिसला होता.