Close

गुलाम चित्रपटासाठी आवाज डबिंग केलेले राणी मुखर्जीला अजिबात आवडले नव्हते… (Rani Mukerji Made A Big Revelation About Aamir Khan)

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. तो मोजकेच पण यशस्वी ठरतील असेच चित्रपट करतो. मात्र लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर आमिर चित्रपटांपासून दूर आहे. तसेच राणी मुखर्जी देखील लग्नानंतर फारशी चित्रपटांत दिसत नाहीए. एके काळी आमिर खान आणि राणी मुखर्जी यांनी गुलाम या चित्रपटामध्ये धमाका केला होता. विशेष म्हणजे त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

राणी मुखर्जी हिने एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. तिने आपल्या करिअरची सुरूवात ही १९९६ मध्ये केली. विशेष म्हणजे गुलाम हा तिचा दुसराच चित्रपट होता. राणी मुखर्जी ही गुलाम या चित्रपटामध्ये आमिर खान याच्यासोबत काम करताना दिसली. मात्र, या चित्रपटाबद्दल मोठा खुलासा राणी मुखर्जी हिने केला आहे.

राणी मुखर्जी हिला या चित्रपटाच्या वेळी आमिर खानने तिच्या व्यक्तीरेखेबद्दल घेतलेला निर्णय अजिबात आवडला नव्हता. गुलाम या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी हिचा आवाज डबिंग करण्यात आला होता.

राणी मुखर्जी ही बॉलिवूडमध्ये नवीन अभिनेत्री असल्याने त्यावेळी ती यावर काहीच बोलू शकली नाही. गुलाम चित्रपटामध्ये राणी मुखर्जी हिचा खरा आवाज नव्हता. आवाज डबिंग करणे आपल्याला अजिबात आवडले नसल्याचे राणी मुखर्जीने म्हटले. परंतु राणीचा आवाज थोडा बसका असल्याने त्यावेळेस राणी मुखर्जीचा आवाज डबिंग करणे हा योग्य निर्णय असल्याचे त्यावेळी आमिरने म्हटले होते

Share this article