सैफ अली खान आणि त्याची माजी पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. सारा अली खान तिची आई अमृता सिंग, वडील सैफ अली खान यांच्या खूप जवळ आहे. यासोबतच तिची सावत्र आई करीना कपूर खानसोबतही तिची चांगली बॉन्डिंग आहे. अनेक प्रसंगी सारा तिची सावत्र आई करीना कपूरसोबतही दिसते. मात्र, सारा अली खान करीना कपूरला आई का म्हणत नाही, असा प्रश्नही अनेकदा उपस्थित झाला आहे. एका मुलाखतीत सैफच्या डार्लिंगने असे न करण्यामागे एक मजेशीर कारण सांगितले होते.
28 वर्षीय सारा अली खान तिच्या कुटुंबाला खूप महत्त्व देते. ती प्रत्येक नातं मनापासून जपण्याचा प्रयत्न करते, म्हणूनच ती सगळ्यांची लाडकी आहे. साराचे तिच्या सावत्र आईसोबतचे नातेही चांगले आहे.
सारा अली खान आणि करीना कपूर खान यांच्या वयात जवळपास 13 वर्षांचे अंतर आहे, त्यामुळे दोघेही आई-मुली ऐवजी मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवण्यास प्राधान्य देतात. सारा अली खान तिच्या सावत्र आईला आई म्हणून संबोधत नाही तर ती तिला काय म्हणते हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता असते.
एका मुलाखतीत जेव्हा चाहत्यांनी असे प्रश्न वारंवार विचारले तेव्हा सारा अली खानने उत्तर दिले की तिची खूप प्रेमळ आई (अमृता सिंग) आहे, त्यामुळे तिच्यासह सर्वजण सहमत आहेत की त्यांनी करीना कपूरला छोटी माँ म्हणू नये. खुद्द करिनानेही तिला माँ किंवा छोटी मां म्हणण्याऐवजी तिच्या नावाने हाक मारण्यास सांगितले होते.
सारा अली खानने सांगितले की ती तिच्या सावत्र आईला तिच्या खऱ्या नावाने किंवा 'के' ने हाक मारते. करीनासोबतचे तिचे नाते सावत्र आई-मुलीचे नसून मैत्रीणीसारखे असल्याचे तिचे म्हणणे आहे. इतकंच नाही तर सारा अली खान लहानपणापासूनच करीना कपूरची फॅन असल्याचंही म्हटलं जातं. करीनाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, अमृता सिंगने स्वतः सांगितले होते की, सारा तिची खूप मोठी फॅन आहे आणि साराला 'पू' नाव आणि यू आर माय सोनिया' हे गाणे आवडते.