Close

वत्सल सेठ आणि इशिताच्या बाळाचा झाला नामकरण सोहळा, गुजराती पद्धतीने झालं बारसं (Ishita Dutta-Vatsal Seth Reveal Baby Boy’s Name, She Shares Glimpses Of Naamkaran Ceremony)

वत्सल सेठ आणि इशिता दत्ता यांनी 20 जुलै 2023 रोजी आपल्या बाळाचे स्वागत केले आणि आता त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव देखील ठेवले आहे. अभिनेत्रीने नामकरण सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

नामकरण समारंभ पारंपारिक गुजराती रीतिरिवाजानुसार झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, इशिता बाळाला आपल्या कुशीत घेऊन जात आहे आणि घरातील वडिलधाऱ्यांनी कपड्याचा पाळणा बनवला आहे ज्यामध्ये बाळाला झोपवले जात आहे. यासोबतच गुजराती पारंपारिक गाणे गाऊन सर्वजण मिळून बाळाचे नाव ठेवतात.

मुलाचे नाव वायु असेल असे सांगितले जाते. व्हिडीओमध्ये पुढे, इशिता आणि वत्सल बाळासोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. घरात फुलांची सजावट केली आहे. ज्यापैकी एकावर बाळाचे नाव वायु लिहिले आहे.

इशिताने कॅप्शनमध्ये आमच्या लहान मुलाच्या नामकरण समारंभाबद्दल लिहिले की… तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे आभार… इशिता आणि वत्सलचे 2017 मध्ये लग्न झाले आणि आता ते आईबाबा म्हणून आपल्या नव्या जीवनाचा आनंद घेत आहेत.

Share this article