घटस्फोटाच्या सात वर्षांनंतर करिश्मा कपूर पुन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींचे लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोट झाले आहेत. काही अभिनेत्रींनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न करण्याचा विचार केला, तर काहींनी मात्र सिंगल राहण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री करिश्मा कपूर हिने देखील घटस्फोटानंतर एकटं राहण्याचा निर्णय घेतला. पण आता वयाच्या ४९ व्या वर्षी करिश्मा कपूर हिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री मुंबईतील एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध पत्रकाराने करिश्माच्या दुसऱ्या लग्नाचा दावा केला आहें.
‘करिश्मा कपूर सध्या मुंबईतील एका श्रीमंत उद्योजकाच्या प्रेमात आहे आणि दोघे लवकरच लग्न करणार आहेत…’ असा दावा पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध पत्रकाराकडून करण्यात आला आहे. पण अद्याप यावर करिश्मा किंवा कपूर कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, याआधी देखील पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध पत्रकाराने बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल अनेक फेक दावे केले आहेत.
तर दुसरीकडे, करिश्मा काही दिवसांपूर्वी फ्रान्सला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
करिश्मा कपूरने शेअर केलेल्या फोटो-व्हिडिओमध्ये अभिनेत्री एकटीच एन्जॉय करताना दिसते आहे. पण अभिनेत्री तिच्या मिस्ट्री मॅनसोबत या सुट्टीवर गेली होती… अशा अनेक अफवा पसरल्या होत्या.
पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं नाव मुंबईतील संदीप तोष्णीवाल या उद्योजकासोबत जोडण्यात आलं. पण काही काळानंतर दोघे विभक्त झाले. एवढंच नाही तर, संदीप तोष्णीवाल यांनी अभिनेत्रीला लग्नासाठी मागणी घातली होती. अशा अनेक चर्चा देखील रंगल्या. पण पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्रीने दोन मुलांसोबत पूर्ण आयुष्य राहण्याचा निर्णय घेतला.
करिश्मा हिचं पहिलं लग्न श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. घटस्फोटा दरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. २००३ साली करिश्मा आणि संजय यांचं लग्न झाले. २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर संजय याने लग्न केलं, तर करिश्मा ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे.