Close

जियाचा Bigg Boss OTT 2 मधला प्रवास संपला; बिग बॉसला मिळाले फिनालेसाठी TOP 5 स्पर्धक (Bigg Boss OTT 2 Jiya Shankar Eviction News)

बिग बॉस OTT 2 मधील स्पर्धक आणि 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकरला बुधवारी फिनालेच्या काही दिवस आधी कमी मते मिळाल्याने बाहेर काढण्यात आले.

आठवड्याच्या सुरुवातीला एका टास्कनंतर तिला मनीषा राणी आणि एल्विश यादव यांच्यासोबत आठवड्याच्या Mid Week मध्ये बाहेर काढण्यासाठी नॉमीनेट करण्यात आले. पण कमी मतं मिळाल्याने जियाचा Bigg Boss OTT 2 मधला प्रवास संपलाय.

वेड सिनेमातून महाराष्ट्राच्या मनामनात पोहोचलेली जिया शंकर Bigg Boss OTT 2 मध्ये सुरुवातीपासून चर्चेत होती. जियाचे घरात अनेकांसोबत वादविवादही झाले. आता जियाला घराबाहेर जावं लागलंय. जिया घराबाहेर गेल्याने मनीषा, एल्विश, पूजा भट्ट, अभिषेक मल्हान आणि बेबीका धुर्वे यांनी आता Bigg Boss OTT 2 च्या फिनालेमध्ये प्रवेश केला आहे.

यंदाचा विकेंड का वार खूपच रंजक ठरला. शोमध्ये विनरची ट्रॉफी दाखवण्यात आली. बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी खूपच आकर्षक होती. बिग बॉस ओटीटी 2 ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ देखील आता जाहिर झाली आहे.

शनिवारच्या वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये, सलमान खानने शेवटी सांगितलं की बिग बॉस ओटीटी 2 ग्रँड फिनाले १४ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे.

हा फिनाले रात्री ९ वाजता Jio सिनेमावर प्रसारित होईल. तर ऑनलाइन हा एपिसोड पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. इतकंच नाही तर यंदाचा फिनाले हा पहिल्यांदाच रविवारी नाही तर सोमवारी होत आहे.

Bigg Boss OTT 2 मध्ये फिनाले जसजसा जवळ येतो, तसं घरात अनेक रंजक गोष्टी घडत असतात. त्यातच फिनालेला काही वेळ शिल्लक असतांना घरात पैशांनी भरलेली सुटकेस उरलेल्या सदस्यांना ऑफर केली जाते. या सुटकेसमध्ये १० लाख असतात जे घेऊन एक स्पर्धक घराबाहेर पडतो. आता फिनालेमध्ये कोण ही पैशाने भरलेली बॅग कोण उचलणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

Share this article