साऊथ सिनेमाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दिकी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. सिद्दीकीने सलमान खानचा हिंदी चित्रपट 'बॉडीगार्ड' दिग्दर्शित केला होता.
मिडीया वृत्तानुसार, सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्दीकी यांना घाईघाईने कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्याचवेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी सिद्दीकी यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. सिद्दिकी यांच्या प्रश्चात पत्नी सजिता आणि तीन मुली आहेत. सुमया, सारा आणि सुकून अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांचे पार्थिव कडवंथरा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते; त्यानंतर त्यांचे पार्थिव श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार असून आज बुधवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सिद्दीकीने 'बॉडीगार्ड'चा हिंदी रिमेक दिग्दर्शित केला होता. ज्यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय करीना कपूर सुद्धा होती. या चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीचे दिग्दर्शनही सिद्दीकीने केले होते, ज्याचे नाव 'कवलन' होते. त्यात विजयने मुख्य भूमिका साकारली होती.
'सिद्दीक-लाल' या जोडीने म्हणून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. १९८९ मध्ये आलेला ‘रामजी राव स्पीकिंग’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. याशिवाय 'हरिहर नगर' (1990), 'गॉडफादर' (1991), 'व्हिएतनाम कॉलनी' (1992), 'काबुलीवाला' (1993), आणि 'हिटलर' (1996) आणि 'बॉडीगार्ड' यांचा समावेश आहे. सिद्दिकी यांचा अखेरचा चित्रपट ‘बिग ब्रदर’ हा 2020 मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये सुपरस्टार मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत अरबाज खान, अनुप मेनन, विष्णू उन्नीकृष्णन, सर्जानो खालिद, हनी रोज, मिरना मेनन, चेतन हंसराज, गाढा सिद्धिकी आणि टिनी टॉम यांच्या भूमिका होत्या.