ग्रीन थालीपीठ
साहित्य : 2 वाटी उपवासाची भाजणी, अर्धा वाटी उकडलेल्या बटाट्याचा कीस, पाव वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धा वाटी हिरवं वाटण (कोथिंबीर-मिरच्या-आलं), अर्धा वाटी खारे शेंगदाणे, स्वादानुसार सैंधव.
कृती : भिजवलेला साबुदाणा हातानेच कुस्करून घ्या. त्यात बटाट्याचा कीस, मीठ आणि हिरवं वाटण घालून एकजीव करून घ्या. शेंगदाणे सोलून जाडसर कुटून घ्या. बटाट्याच्या मिश्रणात दाण्याचं कूट आणि भाजणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. मंद आचेवर तवा गरम करत ठेवा. थालीपीठ हातावर थापून अलगद तव्यावर ठेवा. झाकण लावून मंद आचेवर भाजून घ्या. गरमागरम थालीपीठ लोणच्यासोबत सर्व्ह करा.
Link Copied