काल रात्री मुंबईत चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपची एंगेजमेंट पार्टी होती. आलियाच्या एंगेजमेंट पार्टीला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तर दुसरीकडे, चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची माजी पत्नी कल्की कोचलिन देखील आपली मुलगी आणि प्रियकरासह या एंगेजमेंट पार्टीमध्ये दिसली.
सुहाना खान, खुशी कपूर, इब्राहिम अली खान-पलक तिवारी, मीझान जाफरी यांच्यासह अनेक स्टार्स आलियाच्या एंगेजमेंट पार्टीत सहभागी झाले होते. पण या पार्टीत सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं - अनुराग कश्यपची माजी पत्नी कल्की कोचलिन.
कल्की कोचलिन तिच्या बॉयफ्रेंड आणि मुलीसोबत सावत्र मुलगी आलिया कश्यपच्या एंगेजमेंटमध्ये पोहोचली होती. पेस्टल टोन्ड रंगाची साडी परिधान केलेल्या अभिनेत्रीने हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोज दिली.
कल्की कोचलिनने 2011 मध्ये अनुराग कश्यपशी लग्न केले होते, परंतु लग्नाच्या चार वर्षानंतर ते दोघे 2015 मध्ये वेगळे झाले.