पनीर पुलाव
साहित्य : 1 वाटी किसलेलं पनीर, 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी वरीचे तांदूळ, 2 चमचे जिरं, 2 चमचेहिरवं तिखट, 2-3 ताजी आमसुलं, पाव वाटी भाजलेल्या दाण्यांचा जाडसर कूट, स्वादानुसार सैंधव, तूप.
कृती : वरीचे तांदूळ स्वच्छ धुऊन कापडावर निथळून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यावर जिरं, हिरवं तिखट आणि आमसुलं परतवा. त्यात दाण्यांचा कूट, पनीर आणि ओलं खोबरं घालून खमंग परतवून घ्या. नंतर त्यात वरीचे तांदूळ घालून थोडं परतवा. त्यात 6 वाटी गरम पाणी घाला. एक उकळी आल्यानंतर त्यात सैंधव एकत्र करा. झाकण लावून तांदूळ शिजू द्या. पाणी पूर्णतः आटून तांदूळ सुटा झाला की, आच बंद करा. पनीर पुलाववर साजूक तूप घालून सर्व्ह करा.